एक लेखक खर्च झाला - राजन खान
राजन सरांचे सर्वचं पुस्तके वाचनीय असतात. हे त्यातील एक. खूप सुंदर पुस्तक. लिहिणाऱ्या, चिंतन करणाऱ्या अभ्यासकाने हे पुस्तक वाचायलाच हवे.
मराठी लेखकाच्या वेदनांचा संपूर्ण आढावा या पुस्तकाच्या कथेत समाविष्ठ आहे.
जगभरातल्या अनेक क्षेत्रामध्ये राबणाऱ्या, आपलं आयुष्य घालवणाऱ्या अनेक माणसांच्या गोष्टी आपण वाचतो. जगात महत्वाच्या असणाऱ्या मराठी नावाच्या एका भाषेतल्या, प्रांतातल्या, त्याच भाषेच्या साहित्यक्षेत्रात आपलं संपूर्ण आयुष्य घालविणाऱ्या एका लेखकावरची ही गोष्ट - एक लेखक खर्च झाला.
जगाच्या एका कोपऱ्यात, एका क्षेत्रात, एका माणसांच नेमकं काय चाललंय, काय होतंय हे सांगणारी जागतिक वाड़्मयाच्या तोडीची ही करूणरम्य कहाणी.....



Comments
Post a Comment