विद्यापीठ प्रशासनाचं झंझावती नेतृत्व - कुलगुरू प्रो. डॉ.प्रमोद येवले

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या वर्षपूर्ती निमित्त त्यांच्यां कारकिर्दीचा गौरव करणारा विशेष लेख....

जिवनाच्या पटलावर काही व्यक्ती क्षणात आपले होतात.समाजातल्या कुठल्याही ठिकाणी ते वावरत असताना आपल्या कर्तृत्वातून ते प्रत्येकाला, त्या परिसराला आपलंस करतात. असंच आपल्या कर्तृत्वातून आपली छबी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू, आदरणीय, डॉ.प्रमोद येवले सरांनी आपल्या एक वर्षाच्या कारकिर्दीतून निर्माण केली.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यां पदस्पर्शानी पावन झालेली ऐतिहासिक भूमी म्हणजेच "नागसेनवन" होय. परिवर्तनवादी चळवळीचं शक्तिपीठ म्हणून, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ओळख आहे. मागच्या बऱ्याचं वर्षापासून माध्यमामध्ये विद्यापीठाच्या वाईट प्रशासनाविषयी भरपूर प्रकरणे समोर आली होती. ते डाग पुसण्यासाठी डॉ.प्रमोल येवले यांनी कुलगुरूपदाची सुत्रे १६ जुलै २०१९ या दिवशी घेतली. पदभार घेताचं त्यांनी पारदर्शक प्रशासन चालवायलां सुरवात केली. कुलगुरू हे विदर्भाचे असल्याकारणाने, त्यांना मराठवाड्यांचा दुष्काळ हा नवीन नव्हता. कुलगुरू, डॉ प्रमोद येवले सरांनी काही काळातच मराठवाड्यांच्या दुष्काळामूळे, विद्यार्थ्याची आर्थिक समस्यां ओळखून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा धडाकेबाज निर्णय घेतला. सर्व विद्यार्थ्यांबरोबर अगदी मला ही त्या निर्णयाचा लाभ झाला. व्यवस्थापन परिषद, अधिसभेत त्यानी एकमताने विश्वास जिंकला. पुष्कळ कुलगुरूना भौगोलिक परिस्थितीशी जुळायला बरांच काळ लागतो पण डॉ.प्रमोद येवले यांला अपवाद ठरले. मा.कुलगुरूनी एकाच वर्षात बरेच प्रशासनाच्या हिताचे निर्णय घेतले.
● गेल्या पाच वर्षापासून रिक्त असलेले कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, उपरिसर, संचालक, अधिष्ठाता, यासह सात संविधानिक अधिकाऱ्यांची पूर्णवेळ पदे भरण्यात आली.
● प्रशासनात गतिमानता, कार्यक्षमता व पारदर्शकता या त्रिसुतीचा अवलंब व्हावा यासाठी "फाईल ट्रॅकिंग सिस्टीम" पहिल्याच महिन्यात राबविण्यात आली.
● अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांची निश्चिती करून मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले.
● एनआयआरएफ रँकिंगमध्ये देशात ८५ व्या स्थानावर आलो आहोत.आगामी वर्षात देशात "टॉप ५०" मध्ये येण्याचा संकल्प व नियोजन करण्यात आले आहे.
● सर्व महाविद्यालयांचे अकॅडमिक ऑडिट व पीएचडी संशोधन केंद्र याचा आढावा घेऊन नियमावली निश्चित करण्यात आली.
● रिक्त जागा भरण्यास परवानगी नसल्यामुळे अडचणी येत होत्या.या पार्श्वभूमीवर दिडशेहून अधिक कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली.
● वर्धापनदिन जीवनगौरव पुरस्कारासाठी पहिल्यांदाच नियमावली ठरविण्यात आली.
● गेल्या दोन वर्षापासून रखडलेला दीक्षांत समारंभ मा.कुलगुरूंनी पदभार घेतल्यापासून दोन महिन्याच्या आत दोन दिक्षांत समारंभ घेण्यात आले.
● भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे तेलचित्र व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची निविदा मंजूर करण्यात आली असून, त्याचे काम अंतिम टप्यात आहे.
● सर्वात महत्वाचे म्हणजे औरंगाबाद परिसर व उस्मानाबाद उपकेंद्र परिसरात कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आलेल्या आहेत. जवळपास तीन कोटींचा निधी जिल्हा प्रशासन व उद्योजकांनी सीएसआर फंडातून यासाठी उपलब्ध करून दिली.औरंगाबादची लॅब सुरू झाली असून, उस्मानाबाद उपकेंद्रामधील लॅबचे काम अंतिम टप्यात आहे.
इ. अनेक काम विद्यमान कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या कार्यकाळात झालेले आहेत. जिवन जगत असताना अनेक वाईट घटनांना सामोरे जाव लागतं. असंच मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट राष्ट्रावर आले. याचं संकटामध्ये विद्यापीठाचे वसतीगृहे महानगरपालिकेला देण्याचां महत्वपूर्ण निर्णय घेऊन मा.कुलगुरूंनी आपल्या माणूसकीचा, दूरदृष्टीचा परिचय सर्वाना करून दिला. या कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण बदल आता निर्माण झालेले आहेत. कोरोना पुर्वीचे शिक्षण व त्यानंतरचं शिक्षण यात आता कमालीचा बदल असणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लढण्यांचं रसायन म्हणून डॉ.प्रमोद येवले सरांसारखं अष्टपैलू नेतृत्व या विद्यापीठालां लाभलं हे आमचं खरंच भाग्य.
कोरोना नंतरची स्थिती मा.कुलगुरू व्यवस्थित हाताळतील अशी आशा करून डॉ.प्रमोद येवले सरांना वर्षपूर्तीच्या आणि आगामी कार्याकरीता अनंत हार्दिक शुभेच्छा.

प्रतीक कुकडे.
विद्यार्थी, व्यवस्थापन शास्त्र विभाग,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.


Comments