इस्त्राईलची मोसाद
शब्दा शब्दाला रोमांच उभ करणार पुस्तक म्हणजे इस्त्राईलची मोसाद.
पुस्तकाच्या शेवटच्या पानापर्यंत आपल्या शब्द सामर्थ्यांतून, विचारातून वाचकांना शेवटपर्यंत बांधून ठेवणं फार कठीण कामं असत. शब्दांची मोहिनी वाचकांच्या मनाला चिकटवून विचारांची भुरळ घालणं हे फार कमी लोकांना जमतं असतं. याला पंकज कालूवाला सर अपवाद आहेत.
इस्त्राईलची मोसाद पुस्तक लिहायला किती मेहनत त्यांनी घेतली असेन याची कल्पना येते. पुस्तकाची मांडणी, चित्तथरारक कथा, मोसादचा संपूर्ण इतिहास, त्यांचं गगणचुंबी कार्य, राष्ट्रभक्ती हे सर्व वाचताना डोळ्यासमोर उभं राहतं. अलौकिक साहित्य म्हणतात ते यालांचं.... अँडाँल्फ आईसमनचं अपसरण व शिक्षा, हर्बर्टस् ककुर्सची हत्या, मोसाद विरूद्ध ब्लँक सप्टेंबर, मोर्देशाई वानुनू यांचा पाठलाग व हत्या, म्युनिच आँलिंपिकमधील हत्याकांड व आरोपींना कठोर शिक्षा या सर्व घटना वाचल्यानंतर खरंच अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. पंकज कालूवाला सरांची लेखनशैली ही सामान्यातल्या सामान्य लोकांना कळेल अशी आहे. सर्वांच्या घरी इस्त्राईलची मोसाद हे पुस्तक संग्रही असायंलांच हव. जबरदस्त पुस्तक आहे. खूप आवडलं. मुठभर भूमी लाभलेला इस्त्राईल हा देश भारतासारख्यां अनेक देशांना प्रेरणा देणारा आहे. स्वातंत्र्य अबाधित कसं ठेवायंचं, आपल्या यहूदी माणसांप्रती असणारी तळमळ, आंतरराष्ट्रीय राजकारण, शत्रुचं लक्तरं कसं फोडायचं हे इस्त्राईल कडून तर शिकायला हव. मोसाद, शाबाक यांचं कार्य तर देशभक्ती शिकवून जात. पुस्तक जबरदस्त आहे. पंकज सर आपणांस पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा..
प्रतीक कुकडे, परभणी.
मुक्तपत्रकार.



Comments
Post a Comment