१५३ गडकिल्ले सर केलेला अवलिया..


 

मुंबईत आय.टी कंपनीत नेटवर्कं अँनालिस्ट असलेल्या आलोक ऊर्फ अभिषेक चव्हाण यांच्या गडकिल्ल्याच्या प्रवासाची रोमांचकारी कहाणी आपण पाहूयात. 


भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम आपल्या आत्मचरित्रात असं बोलले होते की, काही स्वप्न आपल्याला झोपू देत नाहीत. त्याचा पाठलाग करताना संघर्षाच्या उन्हात तळपण्याची क्षमता असावी लागते. समाजजिवनात वावरताना काही ध्येयवेडे तरूण आपल्याला बघावया मिळतात. कोणी भारतातील ऐवरेस्ट सर करतं तर कोणी महाराष्ट्रातील ऐवरेस्ट कळसूबाई सर करतं. काही तरी छंद जिवनात असायलांच हवा. त्याशिवाय काही आयुष्याला मजा नाही. मगतो कुठलाही असू द्या. चित्रकलेपासून ते अगदी ट्रेकिंग पर्यंतचा......

आलोक उर्फ अभिषेक चव्हाण म्हणजे अफलातून तरूण. तो मुळचा ठाणे मधला आहे. त्याला ट्रँकिंग ची आवड निर्माण झाली ती अगदी दहावी वर्गापासून. वडिलांनी दिलेल्या पैशाचं योग्यरीत्या जतन करून तो आजुबाजुच्या गडकिल्ल्यावर जात होता. त्यानी पहिला किल्ला सर केला तो म्हणजे रायगड. एखाद्या गोष्टीची आवड निर्माण झाल्यास मनुष्य झोकून देऊन समर्पक भावनेने कार्य करण्याचा प्रयत्न करत असतो. आलोक हा झपाटून गेला. त्याचे वडील हे मुळात पोलिस खात्यात कर्मचारी. वडील ही पाठीमागे खंबीरपणे उभे राहत होते. गडकिल्ले सर करण्यांचं जणू काही त्याचं मनचं सांगतं होतं. किल्ले रायगडपासून ते गोवळकोंडा पर्यंतचे गडकिल्ले त्यांनी सर केलेले आहेत. कोकणापासून ते दक्षिणभारतापर्यंतच्या गडकिल्ल्याचां टप्पा आपल्या जिद्दीने त्याने ओंलाडला आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई (१६४६ मी.), साल्हेर, हरिश्चंद्रगड, हरिहर गड, कोंढाणा, राजगड, उमरखिंड, लोहगा, विसापूर, ठाण्यातील माहूली, मल्हारगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, भैरवगड, अलंग-मलंग-कुलंग, प्रतापगड, कलावंतीन दुर्ग याबरोबरच त्याने महाराष्ट्रातले १०५ गडकिल्ले सर केले असून, दक्षिण भारतातले गोवळकोंडा,चारमिनार, बोनगिर फोर्ट, महाबलीपुरम, वरंगळ, रामसेतू, सारसुणा, सिताबुल्डी, बिदर, काझीपूरा फोर्ट, आझादगड फोर्ट आदीं गड सर केलेले आहेत.

भौतिक सुविधांमध्ये जाणारे पैसे वाचवून त्याने गडकिल्ले सर केलेले आहेत हे विशेष. परिस्थिती कितीही हताश झाली तरी, आपण व्हायचं नाही. मनात सकारात्मकता ठेवली तर कुठलीचं गोष्टं अशक्य नाही. टेकडीची चढाई करणं अवघड आहे परंतु सर्वोत्कृष्ट दृश्य नेहमी वरून दिसतं असतं. छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेऊनचं मी सध्या जिवन जगतोय असं आलोक सांगतो.

जिद्द, चिकाटी, समर्पण, प्रेरणा या गोष्टींचे बिजे या महाराष्ट्राच्या भूमीत सोळाव्या शतकांपासून रूजलेले आहेत. ते बिजे आजच्या पिढीला व येणाऱ्या पिढीला कायम स्वराज्याची प्रेरणा देत राहीन. आलोक उर्फ अभिषेक सारखे असख्यं तरूण समाजात वावरत आहेत. त्यांच्या जिद्दीला माझा सलाम......!



शब्दांकन,

प्रतीक कुकडे, परभणी.

8421131330 .

Comments

Post a Comment