शेजारधर्म व स्टँडर्ड संस्कृती..

शिक्षणांच प्रमाण अलिकडे खूप वाढलेल दिसून येत. शिक्षणाबद्दलं जनजागृती ग्रामीण पातळीपर्यंत गेलेली आहे. शिक्षणामध्ये ज्यांनी गुणवत्तां धारणं केलेली आहे. ते चांगल्यां पदापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. समाजात वावरतांना स्पर्धेच्या या बाजारपेठेत राहून जे गुणवत्ता सिध्द करून, स्वता:ला सिध्द करून, चांगल्यां पगाराच्यां नोकऱ्यां फटकावतात. साहजिकच आहे की, नोकऱ्यां मूळे उत्पन्नांच साधन गवसतं. माध्यमांचा परिणाम सध्या जास्त समाजमनांवर होत असल्यांमूळे उच्चशिक्षित लोकं हे भौतिक सुविधांचा लाभ मोठ्यां प्रमाणात घेताना दिसतात. उत्पन्नांचा स्त्रोत वाढल्यांमूळे त्यांना चाळीतील अथवा गल्लीतील मानसिकता नको वाटते. मोठ्यां लोकांच्यां वस्तीत राहवं वाटतं आणि हा जो निर्माण झालेला समाज हा इतरं समाजांमधून अलिप्त होतो. अलिप्त राहू लागतो. समाजमनांचा दर्जा उंचावल्यामूळे "स्टँडर्ड" हा शब्द त्यांच्यां मुखात रूजू लागतो. माझ्यां म्हणण्यांचां उद्देश हा आहे की, शेजारधर्म व स्टँडर्ड संस्कृती नेमकं काय आहे ? ते आपणं पाहूयात......
उच्चभ्रू संस्कृतीत प्रवेश केल्यानंतर, एखाद्यांच्यां घरी गेल्यानंतर वेलकमचं तोरण लिंबू मिर्ची सोबतं लावलेल असतं पण ते पाहूण्यांना घरा"त" घ्यायचं अथवा स्वागतं करायचं धोरणं असतं कां ? हा प्रश्नं नेहमी मनाला भेडसावणांरा आहे. आपल्यां अवती-भोवती राहणारे शेजारी-पाजारी हे उच्चभ्रू-संस्कृतीत राहताना आढळून येतात. अलिकडे सोशल साईट्सवर जास्त वेळ देणारे, इतके बिझी असतात की, त्यांच्यां शेजारी कोणता इसम राहतो, हे देखील त्यांना माहित नसत. फेसबुक वर पाच हजार मित्र पूर्ण करण्याच्यां भ्रमा मध्ये ते जगतं असतात. आभासी जगात पूर्णपणे बुडाल्यामूळे, सोशल साईट्सवर मित्र असतात पण प्रत्यक्षात कुणाला बोलांव वाटतं नाही. लाईक्स व काँमेंट्स च्या विशाल सागरात बुडालेल्या या आजच्या पिढीला खरं जग दिसतं नाही आहे. "स्टँडर्डनेस" च्या नावाखाली इतरांच्या आयुष्यात न डोकावून पाहणारी हि मंडळी पाश्चात्य संस्कृतीला खतपाणी घालतांना आढळून येतात. अगदी नुकताच अनुभवलेला एक प्रसंग........
माझा अगदी जवळचां मित्र. आम्ही कॉलेजात नेहमी सोबत रहायचो. त्याची बहिण आजारी असल्याने निधन पावली. आम्हाला ती बातमी समजतांच, आम्ही तातडीने त्या कॉलनी मध्ये गेलो. घरासमोर फक्तं चार ते पाच व्यक्ती उभे होते आणि घरासमोर कॉलनीतील लोकं हे बघ्यां ची भूमिका बजावत होते. जणू काही त्यांचं परग्रहावरून पृथ्वी तलावावर आगमन झालंय....या उलट हिच परिस्थिती शहरातल्या चाळी, गल्ली, बोळ्यात असली असती तरी किंवा अविकसित भागात असली असती तर, गर्दीचा तुटवडा निर्माण झाला असता. आजूबाजूच्या परिसरात देखील या घटनेबद्दलं माहित झालं असत.
यासाठी आणखी एक उदाहरण म्हणजे, काही वर्षापूर्वी भरत जाधव या अभिनेत्याचा "वन रूम किचन" हा
चित्रपट प्रदर्शित झाला होता. सदरील चित्रपटातील प्रत्येक भाग हा वास्तवदर्शी परिस्थिती वर अवलंबून आहे. आपल्यां या विषयाशी हा चित्रपट निगडीत असल्याने मी या चित्रपटाचा दाखलां मुद्दामहून देतोय म्हणून हा चित्रपट आपणं बघायलांच पाहिजे असे वाटते.

खाजगी आयुष्य जगतां-जगतां आपल्याला सार्वजनिक आयुष्य असतं हे आपणं सध्यपरिस्थितीत विसरून जात आहोत. आजच्या घडीला आपणं सोशल साईट्सवर बऱ्याचं प्रमाणात ऍक्टिव्ह असतो पण खऱ्यां-खुऱ्यां जिवनात नसतोच. गंमतीची गोष्टं म्हणजे ? लहान मुल हे निरागस तर असतातचं पण, हुशार देखील असतात. त्यांना या गोष्टीं सांगण्याची आवश्यकता पडतं नाही. त्याची एकमेंकासोबत घट्ट मैत्री लिलयेव्दारे होते. कधी-कधी त्यांच्यामूळे समाजात वावरतांना आपल्यां ही ओळखी निघतं असतातं. शेजारधर्म पाळायला पैशाची गरज भासत नसते फक्त हवे असतात. चार गोड-आपूलकीचे शब्द. कारण, आपल्यां अडचणीच्या काळात, जेव्हा आपणं चांगले संबंध लोकांशी जोपासतो तेव्हा, शेजारीच आपल्या अडचणीच्या काळात मदत करतं असतात. शेजारधर्म पाळला पाहिजे हा बोलायचा भाग न राहता सुरवात आपणं आपल्यापासूनच करायला हवी..

प्रतीक कुकडे, परभणी.
(मुक्त पत्रकार)
८४२११३१३३०

Comments