श्रेष्ठ असलेली, मानलेली नाती..
प्रिय माई, त्याचं नाव शुभांगी. मी प्रेमाने त्याना माईच म्हणतो. आमची ओळख चार महिन्याअगोदर झाली. कधी-कधी वाटतं की, आमची ओळख फारचं जूनी आहे.आम्ही दोघेही एकाचं व्यसनाचे माणसे आहोत.आमची भेट सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात अक्षरमानव आयोजित एका कविसंमेलनात झाली. पहिल्याच भेटीत आमची ओळख झाली. बोलता- बोलता त्याच्यांशी नाळ जुळली. बघता बघता कविसंमेलन व्यवस्थित पार पडलं.तिथून आम्ही नविन नात आयुष्यभरां करीता घेऊन बाहेर पडलो.
प्रेम, आपुलकी, आपल्या माणसांप्रती कमालीचा जिव्हाळा, काळजी करणे हा माझ्या माईच्या स्वभावातील मुख्य गुण होय. सध्या मी शिक्षणानिमित्त औरंगाबादला राहतो. अश्या वेळी जवळच्या माणसांची कमतरता क्षणा-क्षणालां जाणवते. जेव्हा मी सध्याकाळी माझ्या खोलीत येतो व निवांत बसतो. प्रत्येक रात्री ठिक नऊ व साडे नऊ वाजता "टिक-टिक" मोबाईल वाजतो "जेवन झालं का तुझं" हा त्यावर एक संदेश रोज येतो. मँसेज बघताचं दिवसभराचां थकवा, आळस क्षणातं पळून जातो. हि गोष्ट सांगायचा उद्देश हा आहे की, त्यांच माझ्याबद्दलचं असणारं प्रेम, आपल्या माणसाप्रती असणारी तळमळ, या गोष्टी लगेच दिसून येतात. जेव्हा मला त्यांची आठवण येते. त्याचा चेहरा क्षणातं माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्या मला माझ्या आजी, आई सारख्या वाटतात. म्हणूनचं मी त्यांना "माई" म्हणतो. एक आदर्श महिला कशी असावी, याचं उदाहरण म्हणजे "माझी माई" होय. चांगल्या मित्रांच्या गप्पा कश्या असतात? एकमेकांचे हाल न विचारता? आज काय नविन वाचलं ? कुठलं पुस्तकं वाचलं ? हे प्रश्न करणारे हे खरे मित्र व मैत्रीण असतातं. माझी माई ही माझी मैत्रीणचं आहे. मला याबाबत एक किस्सा सांगावसा वाटतो, एकदा असाचं मी नैराश्यात होतो व आत्महत्ये संबंधी गोष्टींचा मस्तकांत धुमाकूळ सुरू होता आणी नकळतपणे मी हि गोष्ट माझ्या माईला सांगितली. क्षणांत मला फोन आला. एक आई आपल्या मुलाला कशी समजून सांगते. तसचं तिने मला सांगितलं. प्रत्येक वेळेस माझी माई मला समजवून घेते व समजावून सांगते. मला ती माझ्या आई व आजी सारखी श्रेष्ठ वाटते. माई, मी तुझ्यापासून राहत जरी दुर असलो तरी, तुला कुठलीही इजा पोहोचली तेव्हा माझ्या डोळ्यातले आसवे जमिनीवर पडायला एक सेकंद ही लागणार नाही. ऐवढां जिव्हाळा, प्रेम आपल्या नात्यात आहे. तु ऐवढं धकाधकीच्या जिवनात व्यस्त राहून मला हि थोडं का होईना ? बोलते. त्यासाठी माझ्याकडून मोठा "थँक्यु" ...
प्रतीक कुकडे, औरंगाबाद.

Comments
Post a Comment