व्यवस्थापन परिषदेमधील झंझावती कारकिर्द : किशोर दादा शितोळे.

किशोर दादा यांच्या व्यवस्थापन परिषदेच्या कारकिर्दीला आज दोन वर्ष पुर्ण होत आहे त्यानिमित्त त्यांच्यां कार्याचा गौरव करणारा विशेष लेख.......!



काही माणसे आयुष्यात अनपेक्षितरित्या भेटतात आणी खऱ्यां अर्थाने जिवनाचं सोन करतात. मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी, परिवर्तन वादी चळवळीचं शक्तिपीठ, माहेरघर म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ होय. या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेला भेटलेलं अनमोल रत्न म्हणजे किशोरदादा शितोळे होय. 
दादांचा स्वभाव तसा संयमी, शांत आणि मितभाषी. अफाट सामाजिक ज्ञान, धाडसी निर्णयक्षमता, याची उत्तम सांगड म्हणजे किशोर दादा होय. मराठवाड्याची राजधानी असलेल्या या ऐतिहासिक शहरांमधील सामाजिक चळवळी मध्ये नेहमी अग्रेसर  राहिलेले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांमधील  विधायक प्रश्नांवर कार्य करण्याकरिता किशोर दादा शितोळे यांची नियुक्ती झाली होती. दादांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक विधायक प्रश्न सोडविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यात विद्यार्थीनी सुरक्षेतेचां प्रश्न, विद्यापीठामधील पाण्यांचा प्रश्न, छत्रपती शिवरायांचा पुतळ्याचां प्रश्न, विद्यार्थ्याच्यां वसतिगृहाचां प्रश्न, वसतीगृहाची डागडुजी, प्राध्यापकांची रखडलेली पदभरती, कंत्राटी कामगारांची वेतन वाढ, बारव स्वच्छता, विद्यापीठाच्या परिसरात वृक्षारोपण, विद्यापीठाचे रस्ते डागडुजी इ. अनेक कार्यात राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर दादा शितोळे याची भुमिका अनन्यसाधारण राहिलेली आहे..

किशोर दादा हे विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्व आहे. ते नेहमी एवढ्या मोठ्या पदावर राहुन, कुठलाही बडेजाव न करता, विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला भेट देत असतात. विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. विद्यार्थ्याच्यां मनात सामाजिक नाळ जुळावी याकरीता, आपल्यां "जलदुत" या संस्थेच्या माध्यमातून ते कायम विधायक कार्याची दिशा दाखवितात. कुठल्याही विद्यार्थ्याचां कधीही फोन ते घेतात. कुठलीही समस्या सोडविण्यासाठी ते लक्षणीय पाऊले उचलतात. विद्यापीठातील विद्यार्थ्याची पालकांप्रमाणे काळजी किशोर दादा आणी ज्योती वहिनी घेत असतात. 

सध्याच्यां सामाजिक जिवनात चांगल्या मार्गाला अडथळे जास्त असतात. म्हणजे, एखादे विधायक कार्य करते वेळी ते कार्य होऊ न देणारे खूप असतात. हे वाक्य किशोर दादांना लागु पडतं. जिथे विरोध असतो तिथे सत्य असते. किती मिळत्याजुळत्या गोष्टी आहेत. किशोर दादा ज्यावेळी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये एखादा ज्वलंत मुद्दा मांडतात. त्यावेळी त्यांना बर्‍यां प्रमाणात विरोध होतो. याचां अर्थ असां की, दादा जो विषय मांडतात, तो विद्यार्थ्याच्यां, प्राध्यापकाच्यां जीवनाशी संदर्भित असतो. चांगल्या मार्गात अडथळे मोठ्या प्रमाणात येतात. ते अडथळे दुर व्हावे आणी विद्यापीठाची सुधारणा व्हावी असे विधायक कार्य करण्याकरीता सर्वाच्यां शुभेच्छाची नितांत गरज असतेच. आज दिं १७ मार्च रोजी दादांच्या व्यवस्थापन परिषदेमधील झंझावती कारकिर्दीला दोन वर्षे पूर्ण होत आहे.
त्यानिमीत्त दादांना पुढील वाटचालीस हार्दिक सदिच्छा...... 

प्रतीक कुकडे.
(मुक्त पत्रकार).

Comments