गोड बोलणे हिच आयुष्याची "गुरूकिल्ली"




आयुष्य जगत असताना अनेक चढाओढीचा सामना करावा लागतो त्यात अनेक आचार विचाराचे लोक भेटत असतात.काही आपल्या आळणी आयुष्यात चांगल्या क्षणाची फोडणी घालत असतात तर काही लोकांना आपली प्रगती,आगेकूच, चांगले क्षण बघवल्या जात नाहीत.अश्या प्रकाराचे लोक जीवनाच्या प्रत्येक वळणावर भेटत असतात. अश्या वेळी अशा लोकांचा विचार करायचा नसतो. यांच्या कडे जास्त वेळ लक्ष दिल्यास आपला वेळ वाया जायला जास्त वेळ लागत नाही. वरील लोकांना जिंकायचं असेल तर, त्याला रामबाण उपाय आहे "गोड बोला- गुड बोला".
एखाद्या व्यक्तीबरोबर आपल भांडण झाल असेन किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलचा द्वेष आपल्या मनात हा क्षणिक असायला हवा. जीवनाची वाट तुडवताना पैशाचे प्रमाण कमी असले तरी चालेन पण, शब्द, संवाद हा गोड असायला हवा. ज्या दिवशी या गोष्टीची तरतूद आपण आपल्या आयुष्यात केल्यास, आयुष्य जगण सुखाच आणी सोयीस्कर व्हायला मदत होईल. सृष्टीच्या नियमानुसार, जीवन जगायला एकदाच मिळत. मग गोड बोलून जगायला काय हरकत आहे ? चांगले मधुर शब्द व संवाद असेल तर एखाद्या व्यक्ती प्रती, समाजांप्रती स्नेह, जिव्हाळा वाढत असतो.
दुखा:चा, वेदनेचा पहाड कितीही मोठा का असेना ? मधुरता आपल्या स्वभावात असली की, आपोआप तो सर करता येऊ शकतो. जीवन जगायला काय लागत फक्त चार गोड शब्द या गोष्टीची पूर्तता केल्यास, निरोगी आयुष्यांची हीच मोठी
"गुरुकिल्ली" असे वाटत. जिथे संवाद असेल तिथे वाद होऊ शकत नाही. वाद नसेल तर मानसिक संतुलन ठीक राहीन. आपल्या माणसा प्रती, प्रेम वाढायला मदत मिळेल. पैशा पेक्षा जिवनात माणस कमवणे हिच खरी संपत्ती होय.
"गोड बोला" यातुनच भारतातील सांस्कृतिक विविधता टिकून राहील. जातीयतेचा संपूर्ण नायनाट होईल.

प्रतीक कुकडे 

Comments

Post a Comment