बारवेच पुनरुज्जीवन : काळाची गरज
मागील काही वर्षापासून मराठवाड्याची पाण्याविना लाही लाही होत आहे. पाणी टंचाईची झळ सर्वत्र बसत आहे. आज वर्तमानपत्रात फक्त या धरणाच पाणी त्यांनी पळविल आणी त्या धरणाच पाणी यांनी पळविल या प्रकारच्या बातम्या बघायला मिळतात पण शासनातर्फे ठोस व सकारात्मक पाऊले घेतलेली दिसून येत नाही. म्हणूनच तर पाणी प्रश्नावर कार्य करण्यासाठी “ जलदूत” सारख्या बहुउद्द्शीय संस्था समोर आल्या. अश्या परिस्थितीत या प्रश्नांवर मात करण्यासाठी बारव हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
साधारण ८व्या शतकापासून ते १४व्या शतकापर्यंत बारवाची निर्मिती मोठय़ा प्रमाणात होत होती. पण १४ व्या शतकानंतर जशी यादवकालीन शैलीची मंदिरांची निर्मिती झाली, तसेच अशा प्रकारच्या बारवांची निर्मिती पण थांबली. पुढे १८ व्या शतकात अहिल्याबाई होळकर यांनी व त्यांच्यासारख्या काही जणांनी पुन्हा जाणीवपूर्वक प्राचीन स्थापत्याला प्रोत्साहन दिले, तसेच प्राचीन बारवांचा जीर्णोद्धार केला.
थोडक्यात, बारव स्थापत्य हे महाराष्ट्रातील एक जाणीवपूर्वक विकसित केलेले शास्त्र होते. तसेच त्या त्या स्थपतीने बारवनिर्मितीसाठी हेरलेला जलस्रोत हा इतका अचूकपणे शोधला होता की आजही या बारवांचा उपयोग केला जात आहे. आजही अनेक ठिकाणच्या बारवा जलाशयाने भरलेल्या आहेत. मराठवाडय़ाची संस्कृतीदेखील ही या बारवांच्या आधारे विकसित झाली आहे. आपल्याकडे जशी नदी मातृक संस्कृती आहे, त्याखालोखाल बारव मातृक संस्कृती रुजली आहे, वाढली आहे. बारवांच्या त्या ठिकाणी त्या त्या गावचे सांस्कृतिक जीवन गुंफले जात असे. गावात आणली जाणारी म्हैस येथेच प्रथम पाणी प्यायची. माळी समाजाचे तर बारव हे श्रद्धास्थान आहे, पण गेल्या काही वर्षांत आपण आपल्या या जलस्थापत्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. कालौघात पाणी व्यवस्थापन बदलेले आणि बारव दुर्लक्षित होत गेल्या. बारव निर्मिती करताना त्याच्या पुनर्भरणाच्या दृष्टीने गावाच्या परिसरात जलाशय असायचे. वाढत्या नागरिकीकरणामुळे हे जलाशयदेखील नष्ट होत गेले. परिणामी, बारवांचे पुनर्भरण होणे अवघड झाले. त्याचबरोबर दुर्लक्षित बारवा या कचरा कुंडय़ा बनू लागल्या. आज गरज आहे ती या बारवा स्वच्छ करून त्यातील गाळ काढून त्यांना पुन्हा त्यांच्या जल वैभवाकडे नेण्याची. आज महाराष्ट्रावर दुष्काळाचे भीषण सावट आले आहे. गावोगावी शेतीला सोडा, प्यायला पाणी नाही. धरणांतील जलसाठा सरासरी कमी होत आला आहे व हे निसर्गनिर्मित संकट नसून मानवनिर्मित संकट आहे हे आपल्याला लक्षात घ्यावे लागणार आहे. आपलं हे नेहमीचच झाल आहे आपल्याला घटना घडल्या नंतर जाग येते तत्पूर्वी आपण निद्रा अवस्थेत असतो. आपण विज्ञान व तंत्रज्ञानात भरपूर प्रमाणात प्रगती केली पण आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या शाश्वत गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करत गेलो त्यामुळेच तर आज हि नामुष्की आपल्यावर ओढत आहे. २६/११ चा ताजहॉटेलवर हल्ला का झाला ? आपण आपले महाराज म्हणून म्हणून महाराजचा म्हणजेच शिवनितीचा अभ्यासच नाही केला. हल्ला झाल्यानंतर बरयाच जणानी प्राणाची आहुती दिल्यानंतर आपण आपली सागरी सुरक्षा वाढविण्यावर भर दिला. अनेक जानकारांच पाण्याविषयीच मत अगदी असच आहे. आगामी विश्वयुद्ध “पाण्यावरच” होईल अस त्याचं मत आहे. त्यात आम्ही आमच्याच पूर्वजांनी शोधलेल्या शाश्वत जलपुरवठा पद्धतींचा विनाश करत आणला आहे.बारव हा त्यातीलच एक जलव्यवस्थापनाचा लोकोपयोगी प्रकार. आज महाराष्ट्रात अनेक आसपास बारवा आहेत. त्यातील हजारो केवळ दुर्लक्षामुळे निरुपयोगी झाल्या आहेत. आज गरज आहे ती या बारवांच्या पुनरुज्जीवनांची, ज्यायोगे किमान पिण्याच्या पाण्याची समस्या कमी व्हायला मदत होऊ शकेल. सततचा दुष्काळ आटोक्यात

येऊ शकेल म्हणूनच बारवेच्या पाण्याला दुष्काळात अनन्यसाधारण महत्व आहे.
“जलदूत” ची मोहीम
मागील काही महिन्यापासून “जलदूत” या बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने “बारव वाचवा” हा समाजभिमुख लोकउपक्रम हाती घेतलेला आहे. औरंगाबाद शहरातल्या विविध बारवेच पुनरुज्जीवनाच कार्य जलदूतने केलेल आहे. यात वानखेडे नगर, मुकुंदवाडी, सातारा देवराई येथील बारवांचा समावेश होतो. २० ते ३० फुटांवर पाणी असलेली बारव हे प्रगत भारतीय भूभर्गशास्त्राचा अदभूत नमुना आहे हे आपण विसरता कामा नये. आजच्या घडीला बहुतांश बारव या कचराकुंडीच्या शिकार झालेल्या दिसून येतात त्यामुळेच तर त्या बुजलेल्या वाटतात. आता या कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ऐतीहासिक असा वारसा पूर्वजांनी आपल्याला भेट स्वरूपात दिलेला आहे त्याच जतन करन आपल्या सर्व नागरीकांच आद्यकर्तव्य आहे. तर आपण सर्वांनी बारवेला जपला पाहिजे तर मित्रानो जलदूतच्या “बारव वाचवा” या उपक्रमात सहभाग नोंदवून आपणही या सामाजिक कार्याचा हिस्सा होऊ शकता. पूर्वजांच शहाणपण आता स्वीकारण्याची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली आहे. नाही तर खूप सार्या निसर्गनिर्मित समस्यांना तोंड दयावे लागणार आहे. बरोबर ना ?
चला तर सहभाग नोंदवू “जलदूतच्या” “बारव वाचवा” या कार्यक्रमात....!
“सततच्या दुष्काळापासून मिळवू आता मुक्ती ,
करूया बारवेच्या पुनरुज्जीवनाची आपण सक्ती.....”
शब्दांकन व संकलन : प्रतीक माधुरी ओमप्रकाश
ReplyForward
|

चांगला उपक्रम राबवत आहात शुभेच्छा आगामी काळात ग्रामीण भागातील बारवांकडे ही लक्ष देण्याची गरज आहे कृपया करून आपली डिटेल मला पाठवा जेणेकरून मला तुम्हाला तुमच्याशी जोडून घ्यायला आवडेल.
ReplyDeleteनक्कीच सर , अतिशय आनंद झाला तुमचा प्रतिसाद बघून ,या संबंधी अधिक माहिती तुम्हाला फोन वरून तुम्हाला कळवतो ...
ReplyDeleteखूपच छान संकल्पना आहे तुझी नक्कीच या विचार जर केलात तर दरवर्षी जो मराठवाडा या भागात दुष्काळ पडतो तर हा उपाय केला तर खूप काही मदत होईल.
ReplyDelete