मी पाहिलेला जलदूत.....

देश तुम्हच्यासाठी काय करेल " हे विचारण्यापेक्षा,👉देशासाठी तुम्ही कुठल योगदान दयाल ?
वरील वाक्याप्रमाणे कुठल्याही बडेजावाची अपेक्षा न करता समाजासाठी काही तरी करु? या प्रबळ इच्छेसह झटणारे काही विद्यार्थी म्हणजे ( नागसेनवन परिसरातले म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठात वावरणारे , शिक्षण घेणारे) म्हणजेच तिथे शिक्षण घेणारे जलदूत मधील स्वयंसेवक अन् एक जलदूत ......
साधारण जुलै महिन्याची एक गोष्ट आहे , विदयापीठातील महर्षी शिंदे वसतिगृह क्रं ०४ मध्ये *जलदूत* मधिल उपक्रमाबद्दल विद्यार्थांमध्ये चर्चेला उधान आले होते . विदयापीठातल्या विदयार्थांच एक मुख्य वैशिष्ट्च आहे ते सांगायच झाल तर ,दुसरया शैक्षणिक संकुलातील विदयार्थांना एखादया कार्यक्रमाबद्दल , उपक्रमाबद्दल सांगितल तर त्याची तयारी ते त्या उपक्रमाच्या आदल्या दिवसापासून करतात या उलट विदयापीठातल्या विद्यार्थांना एखाद्या कार्यक्रमाबद्दल सांगितल तर ते त्या कार्यक्रमाची तयारी पंधरा दिवसाअगोदर पासून करतात .शारीरिक मजबुतीबरोबर वैचारीक मजबुतपणा विदयापीठातल्या विदयार्थांमध्ये सैरावैरा धावत असतो. किशोर दादा शितोळे च्या प्रेरणेतून आणी मार्गदर्शनातून "जलदूत सेवाभावी संस्था " साकारण्यात आली .१ टक्का फोटोसेशन व ९९ टक्के समाजकारण या सुत्रासह जलदूत कार्य पार पाडीत असते .
जलदूत मध्ये श्रमदान करणारे वैचारीक व प्रगल्भ विदयार्थी विविध उपक्रमात सहभाग नोंदवितात व जलदूतच्या शिरपेचात मानाचा तुरा नोंदविण्यात महत्वाची भुमीका बजावतात .जूलै महिन्यातला रविवारचा दिवस *(सर्वांच्या आवडीचा)* मुकुंदवाडी बारव या उपक्रमात सहभाग नोंदवायचा होता आणी दोन ते तिन दिवसापासून या विषयी वसतीगृहात चर्चा सुरू होती .
सूर्य उजाडला , विदयार्थांची लगबग घाई सुरू झाली .एकमेंकाना फोन कॉल्स करून सर्व मंडळी एकत्र जमली .अत्यंत दिमाखात अन् उत्साहात मुकूंदवाडी कडे सर्वांनी जायला 🤝👨‍💼सुरवात केली. पाहता -पाहता साठ ते सत्तर जण जमले . मुकुंदवाडीमधील प्राचीन बारव कचर्यांच्या ढिगांनी भरगच्च भरलेली होती . बारव पासून मिळणारा फायदा परिसरातील 🙆🏼‍♂ लोकांना ज्ञात नव्हता याबाबत लोकांमध्ये खरी जागरूकता किशोर दादा शितोळे यांनी केली. काही वेळात सर्व विद्यार्थांनी संपुर्ण बारव स्वच्छ केली व त्याचबरोबर सभोवतालची स्मशानभुमी साफ केली. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या माध्यमांनी या उपक्रमाची मोठ्या प्रमाणात दखल घेतली.
सत्तर जणांनी जलदूतच्या माध्यमातून समाजसेवेच जे कार्य केलेल आहे त्या कार्यांच मुल्य खुप अधिक आहे. उदयाच्या भारताचे हे सामर्थ्यवान तरूण जे स्वत: बददल कमी विचार करून समाजहिताचा विचार सर्वात जास्त करतात यांचा निश्चितच खूप अभिमान वाटतो .आणि खऱ्या अर्थाने तो " मी पाहिलेला जलदूत होय ".

"खरच तुम्हच्या कार्यात
ईश्वराचा अंश आहे,
महापुरूषांच्या विचारांचा
तुम्हच्यात खरा वंश आहे"....
जय जलदूत ....!

Comments