जय जलदूत..

जय जलदूत..

गेल्या काही वर्षापासून संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळाने होरपळले आहे.कष्टकर्यांना विशेषतहा शेतकऱ्यांना याची झळ मोठ्या प्रमाणात बसत असते.अशात जागतिकीकरण अफाट वेगात वाढत असून,ताणतणावाच व्यवस्थापन करण सध्याच्या काळात कठीण होत आहे.त्यातून समाजाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असत.“हम दो और हमारे दो” हेच संपूर्ण विश्व लोकांना वाटू लागल आहे.
समाजमनाची हिच भावना रुजविण्याच कार्य “जलदूत” या सामाजिक संस्थेनी केले.या उलट , आज समाजात बहुतांश ठिकाणी निव्वळ फोटोसेशन असत व कार्य कमी असत. याबद्दल सांगायच झाल की, कुठलही कार्य नसण हि स्वता: समाजाची केलेली फसवणूक ठरते. इथे ध्येयामागे असणारा तरुण अशा प्रकारे श्रमदान करतो की, डोक्यावर तळपणारा भास्कर,श्रमदानातून भूमीवर पडणारा प्रत्येक घामाचा थेंब तो विसरून जातो. व त्या घामाच्या थेंबाच मिळणार समाधान खरच कौतुकास्पद ठरत. त्याचबरोबर हे स्वर्गीय सुख असल्याचा भास आपल्याला होतो.चेहऱ्यावर समाधान नसेल तर त्या जीवनाला अर्थ राहत नाही.समाजातील प्रतिष्टीत नागरीक अजिबात मोठेपणाचा बडेजाव न करता तरुणासोबत श्रमदान करून व ते पाहून शरीराला काम करण्याची एक वेगळीच उर्जा मिळत असते या सर्वांना एकत्र आणण्याची किमया जलतज्ञ किशोर दादा शितोळे यानी केली.
वेळोवेळी मार्गदर्शना बरोबर “जलदूत” मधील स्वयंसेवकासमवेत श्रमदानावेळी किशोर दादांची असणारी थट्टामस्करी एक आपलेपणाची भावना निर्माण करून जाती.ऐवढ्या मोठ्या मनाच्या माणसाचा मोठेपणा पाहून तरुणाईला एक वेगळी प्रेरणा मिळत असते.याच जलदूतमधील विद्यार्थ्याच्या उत्साहामुळे जलदूतचे बहुतांश प्रयोग यशस्वी झालेले आहेत त्यात गिधाडा येथील गोल्डी नदीवरील बंधारा, सातारा देवराईतिल बारव, मुकुंदवाडीतील बारव यात इ.पहावया मिळतात.
'दादा दादा' च्या प्रचंड घोषणेसह नेहमी श्रमदानाचा परिसर दुमदुमतो.खरच जलदूत मध्ये काम करणाऱ्या तरुणाईला पाहून ते 'ईश्वरीदुत' असल्याचा भास होतो.
जय जलदूत..!

एकोपा जूळवायचा आहे,
दुष्काळ तुडवायचा आहे....

Comments