सर पुन्हा तुम्ही होणे शक्य नाही ....

आज अतिशय मनाला दु:ख व मन सुन्न करणारी घटना घडली .काश्मीर मधील अनंतनाग जेथे भारतीय लष्करांचा सर्वात मोठा शस्त्रसाठा आहे त्याचे प्रमुख म्हणुन कार्य करित असताना व , कर्तव्य बजावत असताना आम्हचे मार्गदर्शक कर्नल
महाडिक सर शहीद झाले.
खर पाहता वार्ता कळल्यानंतर विश्वास बसत नव्हता.का ? तर अमिताभ बच्चन , अटलबिहारी वाजपेयी यासारख्या मातब्बर मंडळीना जिवंतपणी मारणारा हा सोशल मिडीया आहे . पण नंतर कळल कि, माहिती खरी आहे .विश्वास मनाला बसत नव्हता , शरीर काहि कार्य करीत नव्हत , मनात आठवणीच चक्रिवादळ दरवळत होत .सर्व जण आम्हचे मित्र व्यक्त होत होते .पण मला काहि शब्द सुचत नव्हते ....

प्रिय कर्नल सर...


सर तुम्हच्या अचानक जाण्यांने माध्यमक्षेत्रा बरोबरच सबंध भारतीय लष्करांच नुकसान झालेल आहे .सर आता हि पोकळी काय माहित कोण भरून काढणार ? तुम्हच्यासारखा हुशार , चाणाक्ष ,शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी दुसरा होणे शक्य नाही.असा कुठला विषय आपण आत्मसात केला नव्हता त्या विषयाबद्दल आपणास माहित नव्हत .कारगिल युद्धात १५ दहशतवाद्यांचा खात्मा करणारे आपण #विर ..आपल्या बंदुकिच्या गोळी वर शत्रुचं नाव लिहिलेल असताना त्या गोळीचे आपण शिकार झालात या सारखी दुदैवी घटना व गोष्ट कोणती नाही . 

आठवणीतले कर्नल सर ....


दिवस येतात अन् पुष्कळ अनुभव देऊन जातात .तशेच अनुभव आम्हच्या आळणी आयुष्यांत कर्नल महाडिक सरांचे आहेत .सर म्हणजे स्वभावाने एकदम मोठ्या ह्दयाचा माणुस सदैव हसतखेळत आयुष्याची वाट तुडवणारा , प्रेरणादायी व्यक्तिमत्व , विद्यार्थांच्या मस्तकात नवनवीन ज्ञानाची भर घालणार सरांच व्यक्तिमत्व होय.एक उत्तम वक्ते सर होते .याबद्दल सांगायच झाल तर आम्ही सर्व विभागात नवीन असताना प्रात्यक्षिक परीक्षेचा एक भाग म्हणजे PPT सादरीकरण होत .सरांनी ३६ स्लाईड ची पीपीटी सादरी करुन तीथे समोर बसलेल्यांच्या भुवयाच उंच गगणाला भिडवलेल्या होत्या. सरांचा पहाडी आवाज,राजबिंडा पर्सनालिटी,आम्हंच्या नेत्रांसमोरून पुढे जात नाही.भटानी रचलेल्या भाकडकथेतल्या महाभारतामधिल सुर्यपुत्र कर्ण सर्वांनी ऐकलाय पण मी पाहिलेला आधुनिक जगातला कर्ण म्हणजे कर्नल जयवंत महाडिक होय .
सर आपण दिल्लीच्या सुभान ला किती मदत करत होतात हे फक्त मलाच माहिती आहे .सर आपण दिलदार तर होताच पण त्याबरोबर व्यवहारांतही पक्के होता.सर आपण मला लँपटॉप पण दिला होता पण व्यवहारांत आपण दोघेही पक्के होतो अन् परिणामी आपण माझ्या सोबत तो व्यवहार पूर्ण केलात . सर त्यावेळेस आपण मला सांगितल ही होत की, सुभान कँमेरा हातात घेऊन कसेतरी पैशे कमवेल पण तु तुझ्या सृजनशिलतेच्या जोरांवर भरपुर पैशाची उलाढाल करशील . सर तुम्हचा माझ्यांवर एक विश्वांस होता आणी या विश्वासाला मी कदापि तडा
जाऊ देणार नाही .असा मला याठिकाणी मला विश्वास वाटतो. वेळेप्रसंगी आपण सर्वांना मार्गदर्शनाबरोबरच आर्थिक सहाय्य करत होतात.पण विभागात वकिली करून मिरवणार्या व खंडपीठात काम करण्यांचे दाखले देणार्यां विद्यार्थांने सरांनाच पैश्याच्या व्यवहारात गंडविले.सर आपल्यासोबत बसण्यांची सुध्दा या लोकांची लायकी नव्हती .सर मुळात आपण मोठ्या मनाचे होता .आपल्याला पदाचा घमंड मुळात नव्हतांच .सर आपण २५लाखाची गाडी घेऊन माझ्यासारख्या अस्तित्वशुन्य विद्यार्थांच्या हॉस्टेलला भेट देत होतात .सर मला किती वेळेस आपण हॉस्टेलमध्ये भेटलात हे फकत मलाच माहित आहे.
‎सर माझ आणी शरद गजलेच आपल्याशी एक जिवाळ्यांच आणि आपुलकीच नात होत.कधीपण आम्ही रस्त्यांवर भटकत असताना आपण आपली कार थांबुन आम्हच्यांशी बोलत होतात . यावरून आपला मनाचा मोठेपणा व्यक्त होतो सर . सर आपण मला म्हटला होता हे बघ प्रतीक " एका वेळी सायकरचे पंम्चर काढायला माझ्याकडे पैसे नव्हते आणी आज मी २५ लाखांच्या गाडीत फिरतो " मेहनत कर तरच अशा भौतिक सुविधांचा लाभ घेशील. अस आपण म्हंटला होता .
‎सर आपल्या सोबतचे अनेक किस्से आहेत.आपण आपल्या कारकिर्दित केलेलं महत्वपुर्ण कार्य कधीच कुणाला सांगितल नाही.आम्हांला तुमचायाबद्दलच्या बर्यांच गोष्टि नंतर माहिती झाल्या .खाम नदिवर केलेला आपण माहीतीपट , विभागांवर रचलेला माहितीपट,कँन्टीन मधील कचर्यांचा किस्सा,मला अँडवेन्चर कँम्प वरून आल्यांवर भरपुर रागवण,शेवटच आपल बोलण आपण माझ्याशी संवाद साधला होता की, छावणीच्या वाघमारे सरला भेटुन ये हे शेवटीच बोलण आपल्यासोबत झाल , माझी इच्छा होती कि सर्व वर्गमित्रा सोबत आपण [त्या संदर्भात मी आपल्याशी बोललो ही होतो] कॉफी घ्यावी पण ती इच्छा अपुर्ण राहिली .आपल्या सोबत ग्रु प फोटोच स्वप्न अपुर्ण राहील .आपल्या वाढदिवसांला मी कविताही आपणास भेट दिली होती [ भेटवस्तुस नकार दिला होता ].आपली शेवटची भेट म्हणंजे आपण हॉस्टेलला आला होता, त्यावेळी आपण मला जर्मन भाषा व त्यातील संधी याबद्दल बोलत होतात .माझ स्वप्न होत की,नोकरी लागली की,आपल्याशी फोन करून बोलाव पण ती इच्छा हि अपूर्ण राहिली कारण नियतीला हि गोष्ट मान्य नव्हती इत्यादी अनेक गोष्टिची आयुष्यंभर आठवण येत राहीन .एकंदरीत आपल व्यक्तिमत्व आजन्म माझ्या स्मरणांत राहीन.
‎सरांना भावपुर्ण , विनम्र आदंराजली , सरांच्या कुटुंबावर पडलेल्या या अचानक अस्मानी संकटाला परमेश्वर लढण्यांच त्याना बळ देवो ऐवढीच इच्छा ....

Comments